लोकमान्य नगरात क्लस्टर की एसआरए! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकमान्य नगरात क्लस्टर की एसआरए!
लोकमान्य नगरात क्लस्टर की एसआरए!

लोकमान्य नगरात क्लस्टर की एसआरए!

sakal_logo
By

ठाणे, ता. ५ ः कोपरीपाठोपाठ लोकमान्यनगर पाडा क्रमांक ४ येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना घोषित करण्यात आलेली आहे. मात्र, येथे क्लस्टर योजना राबविण्यात येणार असल्यासंबंधीचे पत्रक वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. या भागात क्लस्टर होणार की एसआरए योजना, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील, अशी माहिती ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. या भागात क्लस्टर व्हावे, हा आपलादेखील उद्देश असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.
ठाणे शहरातील काही भागात कित्येक वर्षांपासून धोकादायक अनधिकृत इमारतीत रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत आहेत. त्यामुळे तेथील रहिवाशांना हक्काचे घर मिळावे, यासाठी क्लस्टर योजनेला मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी पालिकेकडून विविध भागात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. काही ठिकाणी यापूर्वीच झोपू योजना मंजूर झालेली असताना क्लस्टर योजनेचा आग्रह धरला जात आहे. त्यातच आता, लोकमान्य पाडा ४ या भागात झोपडपट्टी पुनर्वसन योजना घोषित झाली असतानाही त्या ठिकाणी क्लस्टरचे गाजर दाखविले जात असल्याची बाब समोर आली आहे. एसआरए योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे २५ सप्टेंबर २०२१ मध्ये प्रस्ताव दिला होता. त्यास या विभागाने मान्यता देऊन तेथील झोपडपट्टीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण आणि पात्रतानिश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र त्या ठिकाणी आता क्लस्टर होणार असल्याची पत्रके वाटली आहे. त्यामुळे एसआरए प्राधिकरणाने या भागात माहिती पत्रक लावून एसआरएच या भागात होणार असल्याचे स्पष्ट केले; मात्र आता आमदार सरनाईक यांनीदेखील या वादात उडी घेत, या भागातील धोकादायक इमारतीत वास्तव्यास असलेल्या रहिवाशांच्या दृष्टिकोनातून या भागात क्लस्टरच व्हावे, अशी मागणी केली आहे.

काही स्वार्थी राजकारण्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी धोकादायक इमारतींना वाऱ्यावर सोडून एसआरए प्राधिकरणाकडे चुकीचा प्रस्ताव सादर केला आहे. दरम्यान, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आता या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाला दिले आहेत.
- प्रताप सरनाईक, आमदार

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81258 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top