आठ लाखाच्या किराणा मालाची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आठ लाखाच्या किराणा मालाची चोरी
आठ लाखाच्या किराणा मालाची चोरी

आठ लाखाच्या किराणा मालाची चोरी

sakal_logo
By

पनवेल, ता. ५ (प्रतिनिधी) : धानसर येथील कंपनीतून आठ लाख दहा हजार रुपयांचा किराणा माल चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धानसर येथे मिराबो कंपनी अदानी कंपाऊंडमध्ये आहे. कंपनीचे ऑडिटर नीलेश वर्मा यांनी तपासणी केली असता साठ्यामध्ये आठ लाख दहा हजार रुपयांचे १५ लिटर क्षमतेचे २५ डबे कमी असल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता चालक अनिकेत पवार यांच्या टेम्पोमध्ये डबे जास्त भरल्याचे दिसून आले. या वेळी अवेस मोमीन, अदनान शेख, सुरक्षा रक्षक केशव पाल, चालक अनिकेत पवार यांच्याकडे विचारपूस केली. या वेळी केशव आणि अनिकेत यांनी सुपरवायझर अवेस मोमीन आणि अदनान शेख यांच्या सांगण्याप्रमाणे डबे भरल्याचे कबूल केले. या प्रकरणी चौघांविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81262 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top