डीएमईआरने मागवला अवयवदानाचा अहवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीएमईआरने मागवला अवयवदानाचा अहवाल
डीएमईआरने मागवला अवयवदानाचा अहवाल

डीएमईआरने मागवला अवयवदानाचा अहवाल

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : सार्वजनिक क्षेत्रातील अवयवदानाला चालना देण्यासाठी डीएमईआर म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने सार्वजनिक रुग्णालयांना वार्षिक मृत्यू अहवाल आणि झालेल्या अवयवदानांच्या संख्येचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. डीएमईआरच्या मते, राज्य सरकारचे जे. जे. रुग्णालय तसेच पालिकेचे नायर, सायन, विलेपार्ले येथील कूपर आणि परळमधील केईएम रुग्णालयात प्रत्यारोपण कार्यक्रम आहे, परंतु ते अवयवदानात मागे आहेत.

‘रुग्णालयांमध्ये अवयवदान आणि रिट्रायव्हल फारच कमी आहे. त्याशिवाय अवयवदानातही घट झाली आहे आणि अनेकांना त्याचे महत्त्व माहीत नाही. याची दखल घेऊन आम्ही आता रुग्णालयांना तीन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. किती रुग्णांना मेंदूमृत घोषित केले गेले आणि किती अवयव पुनर्प्राप्तीसाठी योग्य आहेत ही सर्व माहिती मागवली आहे, असे डीएमईआरचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले.
झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटरनुसार मुंबईत ३,३२५ रुग्ण कॅडेव्हर म्हणजे मेंदूमृत झालेल्या व्यक्तीच्या मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत. ३२८ रुग्णांना यकृताची गरज आहे. लहान आतड्याच्या प्रतीक्षा यादीत सात, स्वादुपिंडासाठी १२, हृदय २८ आणि ९ जणांना फुप्फुसाची गरज आहे. त्याचप्रमाणे सहा रुग्ण हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाच्या व पाच रुग्ण हाताच्या प्रतीक्षेत आहेत.

डॉ. म्हैसेकर यांच्या म्हणण्यानुसार सरकारी रुग्णालयांमध्ये त्वचा आणि नेत्रदानालाही प्रोत्साहन दिले जात आहे. जेव्हा तुम्ही रुग्णाच्या नातेवाईकांचे समुपदेशन कराल तेव्हाच ते दान करण्यासाठी विचार करतील आणि त्या दिशेने पावले उचलतील. आतापर्यंत त्वचादान आणि नेत्रदानाचे प्रमाण अजूनही वाढले नाही. मृत रुग्णाची त्वचा आणि डोळे दान केले जाऊ शकतात.

मुंबईत २०१९ मध्ये ७६ अवयवांचे दान केले गेले. २०२० मध्ये शहरात ३० अवयवदान झाले. २०२१ मध्ये त्याची संख्या ३२ होते. या वर्षी शहरात आजपर्यंत १६ अवयव दान झाले आहेत.

अवयवदान टास्क फोर्सची स्थापना
अवयवदानाबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. ‘आपण मृत व्यक्तीच्या अवयवदानात सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. इंटेन्सिव्हिस्ट, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर आणि रुग्णालयाचे प्रमुख यांच्याकडून समन्वित प्रयत्न केले जात आहेत,’ असे एका डॉक्टराने सांगितले. झेडटीसीसी रेडिओवरील कार्यक्रमांद्वारे जनजागृती करत आहे. शिवाय अवयवदानाला चालना देण्यासाठी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी अवयवदान टास्क फोर्सची स्थापना केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81268 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top