खारघरमधील मान्सूनपूर्व कामे करावीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमधील मान्सूनपूर्व कामे करावीत
खारघरमधील मान्सूनपूर्व कामे करावीत

खारघरमधील मान्सूनपूर्व कामे करावीत

sakal_logo
By

खारघर, ता. ५ (बातमीदार) : खारघर वसाहत पनवेल महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेने खारघरमधील मान्सूनपूर्व कामे पूर्ण करावीत, असे पत्र सिडकोने पनवेल महापालिकेला पाठविले आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे मेअखेरपर्यंत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र खारघर वसाहतीत ही कामे कोण करणार, याविषयी सिडको आणि पालिकेमध्ये टोलवाटोलवी सुरू असल्यामुळे खारघरवासीयांमध्ये नाराजी पसरली आहे. खारघरमधील रस्ते, पदपथ, फेरीवाले आदी प्रश्नाविषयी सिडको आणि पालिकेकडे विचारणा केल्यास एकमेकांकडे बोट दाखविण्याचे काम केले जाते.

दरम्यान दोघांच्या वादात पावसाळा एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. खारघरमध्ये अजूनही पावसाळी कामाला सुरुवात झालेली नाही. दर वर्षी सिडकोकडून पावसाळी कामे केली जात असत; मात्र यावर्षी सिडकोने पावसाळी कामाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. सिडकोच्या खारघर कार्यालयातील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, खारघर वसाहत ही पालिकेकडे हस्तांतर झाली आहे. त्यामुळे पावसाळी कामे महापालिकेने करावीत, असे पत्र नुकतेच पनवेल पालिका प्रशासनाला पाठविल्याचे सांगितले.

महापालिकेने पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांची निविदा काढली आहे. लवकरच कामे सुरू केली जातील.
- सचिन पवार, उपायुक्त, पनवेल महापालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81274 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top