वैतरणा नदीपात्रात विनापरवाना बोटींग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैतरणा नदीपात्रात विनापरवाना बोटींग
वैतरणा नदीपात्रात विनापरवाना बोटींग

वैतरणा नदीपात्रात विनापरवाना बोटींग

sakal_logo
By

वाडा, ता. ५ (बातमीदार) ः तालुक्यातील खरीवली पौलबारे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत वैतरणा नदीकिनारी खासगी अंचावियो रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये आलेल्या पर्यटकांना वैतरणा नदीपात्रात बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. बोटिंगसाठी रिसॉर्ट प्रशासनाकडून कोणतीही परवानगी न घेता हा व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआमपणे केला जात आहे. दरम्यान, विनापरवाना हा व्यवसाय करणाऱ्या रिसॉर्टवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
रिसॉर्टमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. अतिशय महागडे रिसॉर्ट म्हणून हे रिसॉर्ट पंचक्रोशित ओळखले जाते. रिसॉर्टकडून ग्राहकांना बोटिंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच नदीपात्रात तराफा (राफ्ट) तयार केले असून त्यामध्ये रात्रीच्या सुमारास वाढदिवस, जोडप्यांचे लग्न वाढदिवस साजरे केले जातात. चार-पाच तासांसाठी येथे हजारोंचे बिल आकारले जाते. नदीपात्रात बोटिंगची सफर केली जाते, मात्र हे करत असताना लघुपाटबंधारे विभागाची परवानगी न घेता हा व्यवसाय खुलेआमपणे अन् अनेक वर्षांपासून सुरू असल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली. यासंदर्भात वाड्याचे तहसीलदार उद्धव कदम यांच्याशी संपर्क साधला असता हा विषय आमच्याशी निगडित नाही, अशी माहिती त्यांनी दिली; तर रिसॉर्टचे व्यवस्थापक राज नाबर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

कोट
नदीपात्रात विनापरवाना बोटिंग व तराफाचा वापर करणाऱ्या रिसॉर्टच्या व्यवस्थापनावर कोरोनाकाळापूर्वी कायदेशीर कारवाई केली होती. आता पुन्हा बोटिंग सुरू झाले असल्यास पुन्हा पत्र देऊन कारवाई करण्यात येईल.
- अमित पारधे, शाखा अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, ठाणे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81286 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top