सुसरी नदीवरील पुल धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुसरी नदीवरील पुल धोकादायक
सुसरी नदीवरील पुल धोकादायक

सुसरी नदीवरील पुल धोकादायक

sakal_logo
By

कासा, ता. ५ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धानिवरी येथे सुसरी नदीच्या पुलावरील रस्त्याला भगदाड पडले होते. हे भगदाड ठेकेदार कंपनीने अभियांत्रिकी पद्धत न वापरता साध्या पद्धतीने भरल्याचे निदर्शनास आले आहे. या भगदाडामुळे पुलाला धोका असून भविष्यात येथे अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्ती केली जात आहे. पालघर जिल्हा वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष हरबन्स सिंग नन्नाडे यांनी सांगितले की, सुसरी नदीवरील हा पूल जीर्ण झाला असून महामार्ग प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दुरुस्ती केली पाहिजे. अपघात कमी होण्यासाठी अनेक उपाययोजनांची गरज आहे. या पुलाच्या खालील बाजूला गंज चढून काही भाग धोकादायक झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81287 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top