रायगड अवती भवती बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रायगड अवती भवती बातम्या
रायगड अवती भवती बातम्या

रायगड अवती भवती बातम्या

sakal_logo
By

रायगड अवती भवती बातम्या

चिखली येथे विकासकामांचे भूमिपूजन
पोलादपूर (बातमीदार) : शिवसेनेच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्यात विकासकामांचा धडाका सुरूच आहे. तालुक्यातील चिखली येथील सभामंडप व पुलाचे उद्‍घाटन आणि बांदल भावकीच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आमदार भरत गोगावले यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी काँग्रेस व शेकापच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला.
आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली सध्या महाड विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा धडाका सुरू असून, शिवसेनाच विकास करू शकते. या उद्देशाने त्यांनी आमदार गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत प्रवेश केल्याचे सांगितले. या वेळी पांडुरंग बांदल, सखाराम बांदल, शिवाजी बांदल, दिलीप बांदल, संतोष बांदल, किसन बांदल, रामचंद्र बांदल, रमेश बांदल, दीपक बांदल, विजय बांदल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख नीलेश अहिरे, संपर्कप्रमुख किशोर जाधव, सुभाष पवार, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, शहरप्रमुख तथा नगरसेवक सुरेश पवार उपस्थित होते.

गोठ्याला लागलेल्या आगीत गाईचा मृत्यू
पोलादपूर (बातमीदार) : तालुक्यातील पांगळोली गावातील शेतकरी परशुराम दाजी उपाळे यांच्या गोठ्याला आग लागल्याने एका गाईचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत इतर दोन म्हशी आणि एक गाय गंभीर आहेत.
तालुक्यातील पांगळोली येथे उपाळे हे वयोवृद्ध शेतमजूर म्हशी, गायी या चार-पाच पाळीव जनावरांवर आपल्या कुटुंबाची उपजीविका अवलंबून आहे. मात्र, अचानक लागलेल्या आगीत गोठ्यातील एका गाईचा मृत्यू झाला असून, एक गाय ९० टक्के भाजली आहे. त्याचप्रमाणे दोन म्हशींनाही आगीची झळ बसली आहे. गोठ्याला लागलेल्या आगीत संपूर्ण गोठ्यासह वैरण व चारा जळून गेला आहे. आगीमुळे उपाळे यांच्या उपजीविकेचे साधन हरवल्याने सरकारने त्यांना तत्काळ मदत करणे क्रमप्राप्त बनले आहे. या आगीचा कोतवाल गावचे तलाठी यांनी पंचनामा केला असून, उपाळे यांना तातडीने मदत जाहीर करणे गरजेचे बनले आहे. या वेळी झालेल्या पंचनाम्यात ४० हजार रुपयांची जर्सी गाय, जखमी गायींसाठी ६० हजार, वाड्यातील वैरण गावात ५० हजार असे एकूण एक लाख साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

माजी सरपंच विद्याधर पाटील यांचे निधन
पेण, ता. ५ (वार्ताहर) : तालुक्यातील मोठे भाल येथील रहिवासी असलेले वढाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर धावजी पाटील यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी १९९४ ते १९९९ या काळात वढाव ग्रामपंचायत अंतर्गत अनेक विधायक कामे करून समाजात नावलौकीक मिळवले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आठ मुली, दोन बहिणी, जावई, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा दहावा १३ मे आणि बारावा १५ मे रोजी मोठेभाल येथे होणार आहे.

पेण नगरपालिकेकडून धूरफवारणी मशीन खरेदी
पेण, ता. ५ (वार्ताहर) : पेण शहरात अनेक दिवसांपासून डासांची उत्पत्ती वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे शहरातील या समस्यांकडे अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे, यासाठी सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी नगरपालिकेला निवेदन दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या शेषफंडातून नुकतेच १० धूर फवारणी मशीन घेण्यात आल्या आहेत. जवळपास ४ लाख ३५ हजार रुपये खर्च यासाठी आला आहे. या मशिनींमुळे शहरातील डासांची संख्या आपोआपच कमी होणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81293 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top