
साठाव्या वाढदिवशी अलिबाग ते वडखळ धाव
पेण, ता. ५ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला असताना पेण तालुक्यातील दिनकर गंगाधर म्हात्रे यांनी मात्र साठाव्या वाढदिवसानिमित्त अलिबाग ते वडखळ अशी एक धाव घेतल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबद्दल त्यांचे माळडुंग सोशिअल वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने शिवप्रतिमा, सन्मानपत्र, रोख प्रोत्साहन पर रक्कम आणि शाल, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी माळडुंग सोशिअल वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष परशुराम म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, योगेश पाटील, कबड्डीपटू प्रमोद म्हात्रे, ॲड. जितेंद्र म्हात्रे, विश्वनाथ गायकर, विक्रम म्हात्रे, दशरथ दिवेकर, संतोष म्हात्रे, संजय म्हात्रे, थवई, ज. गो. पाटील उपस्थित होते. पुढील वर्षी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचा मानस प्रभाकर म्हात्रे यांनी व्यक्त केला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81297 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..