कबड्डीला जिवंत ठेवण्यासाठी जीव ओतून खेळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कबड्डीला जिवंत ठेवण्यासाठी जीव ओतून खेळा
कबड्डीला जिवंत ठेवण्यासाठी जीव ओतून खेळा

कबड्डीला जिवंत ठेवण्यासाठी जीव ओतून खेळा

sakal_logo
By

रोहा, ता. ५ (बातमीदार) : लाल मातीतील खरा मर्दानी खेळ म्हणजे कबड्डी. मराठी माणसाने नेहमी आक्रमक राहिले पाहिजे. कबड्डी हा खेळ जिवंत ठेवायचा असेल, तर जीव ओतून खेळा. माझ्या लाल मातीतला खेळाडू देशाच्या संघात देशपातळीवर खेळेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय अनंत गिते यांनी आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील भगवा चषक कबड्डी स्पर्धेच्या उदघाट्नप्रसंगी व्यक्त केले. रोहा तालुक्यातील आंबेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी जिल्हास्तरीय भगवा कबड्डी चषकाचे उद् घाटन माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
आता हरियाणा, पंजाब, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या सर्व राज्यांतील खेळाडू या संघात येऊ लागले आहेत. परिणामी, महाराष्ट्रातील कबड्डी खेळाडू मागे पडत आहेत. आपण त्या जिद्दीने खेळले पाहिजे. या खेळात पहिल्या आशियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. त्यांचे कर्णधार कोकणातील अशोक यांनी केले होते, असेही गीते म्हणाले. या वेळी भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांनी, खरे म्हणजे कबड्डी हा खेळ लोकप्रिय खेळ आहे. अशा प्रकारे कबड्डीचे आयोजन करून हे खेळाडू जिल्ह्यातून राज्यात, राज्यातून देशात असे निवडले जाऊन खेळतात, अशा शब्दात खेळाडूंना प्रोत्साहित केले. या वेळी आमदार महेंद्र दळवी, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, रमेश सुतार, रोहा तालुकाप्रमुख समीर शेडगे, उप तालुकाप्रमुख चंद्रकांत लोखंडे, राजेंद्र राऊत, अमर तेलंगे, कुलदीप सुतार, ज्ञानेश्वर खांमकर, मिलिंद पवार, ज्येष्ठ नेते शंकर म्हसकर, शिवराम महाबळे, शिवसेनेचे पदाधिकारी, खेळाडूंसह प्रेषक उपस्थित होते.

ऑलिम्पिकची शक्यता
कबड्डी हा खेळ रोजगाराचे साधन आहे. या खेळासाठी मोठ्या उद्योजकांसह सेलिब्रिटीही उपस्थित राहतात. त्यामुळे तो आशियास्तरासह अनेक देश खेळू लागल्यामुळे तो ऑलम्पिकमध्येही खेळला जाईल.

रोहा : कबड्डी स्पर्धेत मनोगत व्यक्त करताना माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81301 Txt Raigad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top