‘विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्याचे तंत्र आत्मसात करावे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्याचे तंत्र आत्मसात करावे’
‘विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्याचे तंत्र आत्मसात करावे’

‘विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्याचे तंत्र आत्मसात करावे’

sakal_logo
By

ठाणे, ता. ५ (बातमीदार) : पत्रकाराने संवादक असले पाहिजे. प्रत्येकाने संवाद कौशल्य, तंत्रज्ञान आत्मसात करायला हवे. तसेच विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्यासमोर नेमकेपणाने मुद्देसूद बोलण्याचे तंत्र आत्मसात केले पाहिजे, असे प्रतिपादन साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी केले. ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळ संचलित जोशी बेडेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या जनसंज्ञापन विभागातर्फे ‘ऋत’ या वार्षिक वर्तमानपत्राचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून जोशी बोलत होते. या वेळी विद्या प्रसारक मंडळाचे कार्यध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रसन्न जोशी पुढे म्हणाले की, बदलत्या पत्रकारितेच्या युगामध्ये वेगाने बदल घडत असून त्यासाठी प्रत्येकाने संवाद कौशल्य, तंत्रज्ञान, सॉफ्ट स्किल्स, भाषेवरील प्रभुत्व संपादित केले पाहिजे. दीर्घकाळ पत्रकारितेत काम केलेल्या अनेकांना कॅमेरासमोर दोन मिनिटे नेमकेपणाने बोलता येत नाही. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्यासमोर नेमकेपणाने मुद्देसूदपणे बोलण्याचे तंत्र हस्तगत केले पाहिजे. ज्या बातम्या मुख्य प्रवाहातील टीव्ही चॅनल्स कव्हर करत नाहीत, त्या पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या माध्यमातून प्रकाशित केल्या पाहिजेत.

याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, डॉ. प्रशांत धर्माधिकारी, डॉ. विमुक्ता राजे उपस्थित होते. यंदाच्या ‘ऋत’ या वर्तमानपत्राचा प्रमुख संपादक नितेश चव्हाण, गंधर्व पुरोहित आणि मैथिली फडके यांनी वर्तमानपत्र निर्मिती करताना आलेले अनुभव व्यक्त केले. जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. महेश पाटील, उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे, ग्रंथपाल नारायण बारसे, डॉ. संगीता मोहंती, प्रा. मानसी जंगम, प्रा. प्राची नितनवरे, अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81303 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top