रात्रीच्या वेळी ध्ननिक्षेपकावर निर्बंध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रात्रीच्या वेळी ध्ननिक्षेपकावर निर्बंध
रात्रीच्या वेळी ध्ननिक्षेपकावर निर्बंध

रात्रीच्या वेळी ध्ननिक्षेपकावर निर्बंध

sakal_logo
By

अंबरनाथ, ता.५ (बातमीदार) ः सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंबरनाथमध्ये रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अंबरनाथ पोलिसांनी केले आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या धार्मिक स्थळांवरील ध्वनिक्षेपकांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलिस आयुक्त जगदीश सातव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्या उपस्थितीत अंबरनाथ पोलिस ठाण्यात शांतता समिती आणि मोहल्ला कमिटी, मंदिराचे पुजारी, मस्जिद, मंदिराचे ट्रस्टी यांच्या बैठकीचे गुरुवारी (ता. ५) आयोजन करण्यात आले होते. या वेळी हा निर्णय घेण्यात आला.

न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. याबाबत कुणीही कायद्याचे उल्लंघन करून कायदा मोडू नये. न्यायालयाचे नियम असल्याने सर्वांना पाळावे लागतील. ध्वनिक्षेपकांचा वापर करताना आवाजाची ठराविक पातळी ठेवावी लागेल. ध्वनिक्षेपकांच्या परवानगीसाठी अर्ज करावेत. वरिष्ठ पातळीवर निर्णय होताच परवानगीबाबत कार्यवाही केली जाईल, असे सहायक पोलिस आयुक्तांनी सांगितले.
या वेळी मेहबूब मीरा सय्यद, माजी नगरसेवक उमेश पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सुमती पाटील, धार्मिक संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
--------------
एक लाख रुपये दंडाची तरतूद
आदेशाचे उल्लंघन केल्यास ध्वनिप्रदूषण अधिनियम २००० नुसार गुन्हा दाखल होणार आहे. तो सिद्ध झाल्यास पर्यावरण अधिनियम १९८६ च्या कलम १५ अन्वये पाच वर्षांपर्यंत कैद आणि एक लाख रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. तसेच ध्वनिक्षेपक वापरासाठीचा परवाना रद्द केला जाईल, अशी माहिती पोलिस प्रशासनातर्फे यावेळी देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81304 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top