ऐन उन्हाळ्यात वॉटर व्हेडिंग मशिन्स बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐन उन्हाळ्यात वॉटर व्हेडिंग मशिन्स बंद
ऐन उन्हाळ्यात वॉटर व्हेडिंग मशिन्स बंद

ऐन उन्हाळ्यात वॉटर व्हेडिंग मशिन्स बंद

sakal_logo
By

कल्याण, ता. ५ (बातमीदार) ः लोकल, मेल गाडीच्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकामध्ये शुद्ध आणि स्वस्त दरात थंड पाण्याचे वॉटर व्हेडिंग मशिन्स सुरू केल्या होत्या. मात्र, त्या बंद पडल्याने प्रवासी वर्गाला १५ ते २० रुपये खर्च करून मिनरल वॉटरच्या बाटल्या खरेदी कराव्या लागत आहेत. या आर्थिक भुर्दंडामुळे प्रवासी वैतागले आहेत. त्याचप्रमाणे या बाटल्या रेल्वे रुळावर फेकून दिल्याने अस्वच्छतेचा प्रश्नही उभा राहत आहे.

कल्याणसहित अनेक रेल्वेस्थानकांमध्ये मध्य रेल्वेने वॉटर व्हेडिंग मशिन्स बसवल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना शुद्ध थंड पाणी कमी किमतीत मिळत होते. विशेषतः उन्हाळ्यात त्याचा फायदा प्रवासी वर्गाला होत असे. मात्र, कोरोना काळापासून कल्याणसह पुढील अनेक रेल्वेस्थानकांमधील मशिन्स बंद पडल्या. कोरोनाचा काळ उलटून गेला तरी त्या बंदच आहेत. त्यामुळे प्रवासी मिनरल वॉटरच्या बाटल्या विकत घेत आहेत. यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागतातच, पण प्रवासी पाणी पिऊन या बाटल्या रेल्वे रुळावर फेकून देतात. त्यामुळे रुळावर पाणी तुंबण्याची समस्याही उद्भवत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी रेल्वेने बॉटल क्रशिंग मशिन्स बसवल्या होत्या; पण या मशिन्ससुद्धा अनेक दिवसांपासून बंद पडल्या आहेत, असा आरोप कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केला आहे.
-----------
निर्णय वरिष्ठ पातळीवर
याबाबत कल्याण रेल्वेस्थानकात स्थानिक अधिकारी वर्गाला संपर्क साधला असता ते म्हणाले की, थंड पाण्याच्या मशीनबाबत निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जातो. तसेच क्रशिंग मशिन्स सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.
--------
रेल्वे प्रशासनाचा कारभार भोंगळ आहे. अधिकारी असंवेदनशील झाले आहेत. उन्हाळ्याच्या उरलेल्या महिन्यात तरी पाणी पिण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- श्याम उबाळे, सचिव, प्रवासी संघटना.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81306 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top