अल्पवयीन मुलीच्या विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावास
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावास

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : अल्पवयीन मुलीसह तिच्या मैत्रिणींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मोहम्मद तारिक इस्लाम शेख (वय २४) असे या आरोपीचे नाव आहे. ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांनी बुधवारी (ता. ४) झालेल्या सुनावणीत त्याला दोषी ठरवले. ही घटना २०१७ साली ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या खटल्यात सरकारी वकील म्हणून रेखा हिवराळे यांनी काम पाहिले.

पीडित मुलगी आणि तिच्या मैत्रिणीच्या शाळेत जाण्याच्या रस्त्यावर उभे राहून आरोपी त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करायचा. याप्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला चितळसर मानपाडा पोलिसांनी अटक केली. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर हा खटला अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. वीरकर यांच्या न्यायालयात आला. यावेळी सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून मोहम्मद तारिक याला दोषी ठरवण्यात आले. त्याला २ वर्षांचा सश्रम कारावास आणि २ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास २० दिवस साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक आर. सी. घनवट यांनी केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81307 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top