अभिनय कट्ट्यावर ‘शोध कलाकारांचा’ मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनय कट्ट्यावर ‘शोध कलाकारांचा’ मोहीम
अभिनय कट्ट्यावर ‘शोध कलाकारांचा’ मोहीम

अभिनय कट्ट्यावर ‘शोध कलाकारांचा’ मोहीम

sakal_logo
By

ठाणे, ता. ५ (बातमीदार) : ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर शोध कलाकारांचा या मोहिमेअंतर्गत ४५ व त्यावरील वयोगटासाठी मोफत अभिनय व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दिग्दर्शक किरण नाकती यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. शनिवार (ता. ३०) आणि रविवारी (ता. १) ५२३ आणि ५२४ क्रमांकाच्या कट्ट्यावर झालेल्या अभिनय प्रशिक्षण शिबिरात एकूण ८० प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला.

शिबिराच्या सुरुवातीला किरण नाकती यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींचा स्टेजवर उभे राहून बोलण्याचा आत्मविश्वास वाढवला. तसेच प्रत्येकाच्या अंगभूत असलेल्या स्वतःलाच माहीत नसलेल्या विविध गुणांची जाणीव करून दिली. उपस्थित प्रशिक्षणार्थींनी वेगवेगळे गट करून गणेशोत्सव, दिवाळी, होळी, लग्नाची वरात, जत्रा, वृद्धाश्रम असे विविध विषय घेऊन कलाविष्कार सादर केले. काव्यवाचन, नृत्य, वक्तृत्व अशा प्रत्येक घटकांचे प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन करण्यात आले. या वयोगटातील तसेच अगदी ६ ते ८५ वयोगटातील आवड व तयारी असणाऱ्या जास्तीत जास्त इच्छुकांना भविष्यातही शोध कलाकारांचा या मोहिमेअंतर्गत मोफत प्रशिक्षण देण्यात येईल, असे किरण नाकती यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81308 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top