नवी मुंबईत ''बसव-ज्योत'' यात्रा मिरवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईत ''बसव-ज्योत'' यात्रा मिरवणूक
नवी मुंबईत ''बसव-ज्योत'' यात्रा मिरवणूक

नवी मुंबईत ''बसव-ज्योत'' यात्रा मिरवणूक

sakal_logo
By

तुर्भे, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबईतील शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी गेल्या २२-२३ वर्षांपासून महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त शहरामध्ये ‘बसव-ज्योत’ यात्रेचे नियोजन करते. महात्मा बसवेश्वरांच्या ८८९ व्या जयंतीनिमित्त नवी मुंबई शहरामध्ये मिरवणूक यात्रा बुधवारी (ता. ४) पार पडली. सेक्टर- २८ वाशी येथील चौकापासून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत निघालेल्या या यात्रेमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शरण संकुलच्या सदस्यांनी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात जाऊन महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची उपायुक्त दादासाहेब चाबूकस्वार यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. रविवारी (ता. ८) वाशी, सेक्टर-९/ए येथील शिव-विष्णू मंदिर सभागृहात शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी ने महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81311 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top