शिरवणेतील नागरी आरोग्य केंद्राचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरवणेतील नागरी आरोग्य केंद्राचे भूमिपूजन
शिरवणेतील नागरी आरोग्य केंद्राचे भूमिपूजन

शिरवणेतील नागरी आरोग्य केंद्राचे भूमिपूजन

sakal_logo
By

बेलापूर, ता. ७ (बातमीदार) : शिरवणे येथे नागरी आरोग्य केंद्राचे नूतनीकरण व भूमिपूजन सोहळा गुरुवारी (ता. ५) आयोजित करण्यात आला होता. नागरिकांना भविष्यात उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आरोग्य केंद्राचे नवी मुंबई महापालिकेतर्फे नूतनीकरण करण्यात येत आहे. कोणत्याही स्थितीत नागरिकांना मिळणारी आरोग्य सेवा खंडित होऊ नये, यासाठी सेक्टर १ मधील शिरवणे येथील टिंबर मार्टनजीक महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येत आहे. माजी महापौर जयवंत सुतार यांनी पाठपुरावा करून शिरवणे गाव व परिसरात विविध नागरी उपयोगी वास्तू व सुविधा प्रदान करून विकास करण्यात आला आहे. याप्रसंगी माजी महापौर जयवंत सुतार, डॉ. राजेश पाटील, काशिनाथ पाटील, युवा नेता जयेंद्र सुतार, माधुरी सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81313 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top