सुटीमुळे मुलांचे लसीकरण संथगतीने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुटीमुळे मुलांचे लसीकरण संथगतीने
सुटीमुळे मुलांचे लसीकरण संथगतीने

सुटीमुळे मुलांचे लसीकरण संथगतीने

sakal_logo
By

वाशी, ता. ५ (बातमीदार) : उन्हाळी सुट्टीपूर्वी १२ ते १४ वयोगटातील मुलांना किमान पहिली लसमात्रा १०० टक्के देण्याचे नियोजन नवी मुंबई महापालिकेने केले होते; मात्र वाढलेला उन्हाचा पारा व लागलेली सुट्टी यामुळे या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. दरम्यान, सुट्टी काळातही शहरात मुलांचे लसीकरण सुरू ठेवण्यात येणार आहे.

नवी मुंबई महापालिकेने १८ वर्षांवरील लसीकरणाचे पहिल्या व दुसऱ्या मात्राचे १०० टक्के उद्दिष्ट गाठले आहे. १२ ते १४ वयोगटातील लसीकरणासाठी लोकसंख्येच्या ३.१५ टक्के म्हणजेच ४७,४५९ एवढे लाभार्थी आहेत. यातील ३८४९० मुलांना पहिली; तर २५०२१ जणांना दुसरी लसमात्रा देण्यात आली आहे. नवी मुंबईत १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग सुरुवातीपासून चांगला होता. पालिकेने शहरातील नेरूळ, ऐरोली, वाशी, तुर्भे तसेच कामगार विमा रुग्णालय येथील जम्बो सेंटरबरोबरच शहरातील २११ शाळांमध्ये १२ ते १४ वयोगटातील लसीकरणाचे पालिकेने नियोजन केले होते. या वयोगटातील लसीकरणासाठी पालिकेला अद्याप ९७ हजार कोर्बेवॅक्स लस प्राप्त झाल्या आहेत; मात्र आता शाळांना लागलेली उन्हाळी सुट्टी; तर दुसरीकडे उन्हाचा चटका याचा परिणाम लसीकरणावर होत आहे.

मुलांच्या लसीकरणात शाळांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अजूनही शाळा चांगली मदत करत आहेत, परंतु एकीकडे मुलांना लागलेली उन्हाळ्याची सुट्टी व दुसरीकडे शहरात असलेला उन्हाचा चटका याचा परिणाम लसीकरण किंचितसे होत असल्याचे दिसून येत आहे.
डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरणप्रमुख

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81314 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top