
नाल्याच्या संरक्षण भिंतीचे पूर्ण
तुर्भे, ता. ७ (बातमीदार) : बोनसारी गावालगत असलेल्या नाल्याच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. दर वर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्यापासून होणारा धोका यंदाच्या पावसाळ्यात टळल्याने स्थानिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
मागील तीन वर्षांपूर्वी तुर्भे एमआयडीसीतील बोनसारी गावालगत असलेल्या नाल्यालगतच्या वस्तीत पावसाळ्यातील पाणी शिरले होते. ८ जुलै २०१९ रोजी पडलेल्या मुसळर पावसामुळे नाला तुडुंब भरला होता आणि येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरले होते. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. रामस्वामी एन. व तत्कालीन महापौर जयवंत सुतार यांनी पाहणी दौरा केला होता. या नाल्याभोवती दुतर्फा तात्काळ संरक्षक भिंत बांधण्याचा आदेश त्यांनी दिले होते. आयुक्तांनी हा नाला भरण्यास कारणीभूत असलेल्या दगडखाण मालकांवर गुन्हा नोंदविण्याचे व या ठिकाणी तात्काळ सुरक्षा भिंत उभारण्याचे, तसेच नाल्याची खोली वाढविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी नाल्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती.
गेल्या वर्षी पावसाळ्याच्या आधी काम हाती घेतले होते; पण पावसाळा लागल्याने काम बंद करण्यात आले होते; पण आता काम पूर्ण झाल्याने नाल्यातील पाण्याचा शिरकाव रहिवाशांच्या घरात होणार नसल्याने दर वर्षी घोंगावणारे संकट टळले.
सव्वापाच कोटींचा खर्च
नाल्याला संरक्षक भिंत बांधण्याचा ५ कोटी २४ लाख २२ हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार काम हाती घेऊन ते यंदाच्या पावसाळ्या आधी पूर्ण झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जाते.
अतिक्रमण करणाऱ्यांना चाप
अनेकांनी यापूर्वी नाल्यात बांधकाम करून नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाच्या जागेत बांधकाम करत अतिक्रमण केले होते. संरक्षण भिंत नसल्याने अनेकांनी दगडाचा भराव टाकून नाल्यातील जागेत अतिक्रमण केले होते. मात्र आता संरक्षण भिंतीमुळे अतिक्रमण करणाऱ्यांना चाप बसला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81315 Txt Navimumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..