अनाथ मुलांच्या मदतीसाठी संगीत कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनाथ मुलांच्या मदतीसाठी संगीत कार्यक्रम
अनाथ मुलांच्या मदतीसाठी संगीत कार्यक्रम

अनाथ मुलांच्या मदतीसाठी संगीत कार्यक्रम

sakal_logo
By

बेलापूर, ता. ५ (बातमीदार) : आपुलकी फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न लता मंगेशकर, बप्पी लाहिरी, बालसुब्रमण्यम यांच्या गाण्यावर आधारित ‘ए म्युझिकल ट्रिब्यूट’ हा गायनाचा कार्यक्रम पार पडला. अनाथ मुलांच्या मदतीसाठी या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील???????????

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती लाभली होती.

गायक गोविंद मिश्री, जया पियुष, संदीप शहा, शाकंबरी बागडे, डी. महेश यांनी गायनाने उपस्थितांची मने जिंकली. या संगीत कार्यक्रमाला अरुण कारेकर यांचे संगीत संयोजन लाभले. या कार्यक्रमातून जमा झालेल्या रकमेतून बालग्राम अनाथ आश्रमाला मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे प्रवीण मोहोकर यांनी दिली. यावेळी आपुलकी फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय जाधव, नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेवक सुलोचना कल्याणकर, डॉ. सचिन जाधव, अनिल जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81316 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top