शिवसैनिकांनो कामाला लागा ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसैनिकांनो कामाला लागा !
शिवसैनिकांनो कामाला लागा !

शिवसैनिकांनो कामाला लागा !

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : येत्या काही दिवसांत महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने कामाला लागण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिल्या; तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील आयोध्येला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार त्याची तयारी आता शिवसैनिकांनी सुरू केली आहे.

येत्या १४ मे रोजी मुंबईत बीकेसी येथे उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेला कशा पद्धतीने हजेरी लावायची, कशी तयारी करायची यावर शिंदे यांनी चर्चा आणि मार्गदर्शन केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची रूपरेषा ठरवण्यात आली. अयोध्येची तारीख निश्चित नसली तरीदेखील त्याची तयारी आतापासून करा, असा सल्लाही या वेळी देण्यात आला. महापालिका निवडणुकांच्या आधी ठाकरे अयोध्येला जातील, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचा धडाका सध्या सुरू आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ते शिवसेनेवर कुरघोडी करीत आहेत. आता उद्धव ठाकरेदेखील सभा घेणार असून तेदेखील अयोध्येला जाणार असल्याने येत्या काळात हिंदुत्वाचा मुद्दा आणखी तापणार असल्याचे दिसत आहे. या बैठकीला माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह माजी नगरसेवक, विभागप्रमुख आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81320 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top