
वीजपुरवठा पुर्ववत करण्याची संधी
कल्याण, ता. ५ (बातमीदार) ः कल्याण परिमंडळातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले ग्राहक व वीज चोरीच्या प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोडीने निपटारा करण्याची संधी आहे. त्यासाठी या ग्राहकांना तालुका व जिल्हा स्तरावर शनिवारी (ता. ७) आयोजित लोक अदालतीत सहभाग घ्यावा लागणार आहे. परिमंडळातील संबंधित ग्राहकांना लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत विधी विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाली नसेल तरीही या ग्राहकांना अदालतीत सहभागी होता येईल. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना विलासराव देशमुख अभय योजनेतून व्याज व दंड माफी सोबतच थकीत रकमेत अनुक्रमे ५ व १० टक्के सवलतीचा लाभ मिळवण्याची संधी मिळणार आहे. कायमस्वरूपी वीज खंडित ग्राहकांनी जिल्हा व तालुका स्तरावर आयोजित लोक अदालतीत सहभागी होऊन सन्मानाने वीजपुरवठा पूर्ववत करून घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81330 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..