२६ मशिदींत पहाटेची अजान भोंग्यावर वाजवणार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे मशिदींच्या ट्रस्ट आणि मौलवींनी सांगितले.
२६ मशिदींत पहाटेची अजान भोंग्यावर वाजवणार नाही

२६ मशिदींत पहाटेची अजान भोंग्यावर वाजवणार नाही

मुंबई : राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्यांवर वाजवण्यात येणाऱ्या अजानच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गृह विभागाने एकीकडे चोख बंदोबस्त ठेवलेला असतानाच दक्षिण मुंबईतील २६ मशिदींनीही मुंबईतील अनेक भागांत पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर न करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार असल्याचे मशिदींच्या ट्रस्ट आणि मौलवींनी सांगितले.

बुधवारी रात्री उशिरा सुन्नी बडी मशिदीत झालेल्या मौलाना आणि ट्रस्टच्या बैठकीत अजानबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. भायखळा, नागपाडा, आग्रीपाडा, मदनपुरा आदी ठिकाणच्या मशिदींच्या ट्रस्टी आणि मौलवींचा बैठकीत सहभाग होता. बैठकीतील निर्णयानुसार बुधवारी आणि गुरुवारी दक्षिण मुंबईतील मशिदीच्या ठिकाणी अजान लाऊडस्पीकरवर झाली नाही. त्यानंतर दिवसभरातील अजानसाठी मात्र लाऊडस्पीकर वापरण्यात आले. बैठकीतील निर्णयानुसार रात्री १० ते सकाळी ६ दरम्यान मशिदीच्या भोंग्यावरून पहाटेची अजान देण्यात येणार नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81334 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top