ॲड. सुरेश मोहिते कामगार सेनेच्या चिटणीसपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲड. सुरेश मोहिते कामगार सेनेच्या चिटणीसपदी
ॲड. सुरेश मोहिते कामगार सेनेच्या चिटणीसपदी

ॲड. सुरेश मोहिते कामगार सेनेच्या चिटणीसपदी

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ठाणे परिवहन सेवेचे माजी सभापती ॲड. सुरेश मोहिते यांची शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेच्या चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांच्यावर कामगारवर्गातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ॲड. सुरेश मोहिते यांनी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचे सभापती म्हणून काम पाहिले आहे. त्या वेळी कामगारांच्या समस्या सोडविण्यावर त्यांनी भर दिला होता. कामगार क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामांमुळेच त्यांची नियुक्ती कामगार सेनेच्या चिटणीसपदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. त्यांच्या या नियुक्तीमुळे कामगारवर्गातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे; तर ठाण्यातील येऊर ट्रेकर्स ग्रुपनेदेखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81340 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top