
सिद्धार्थ कॉलनीचा वीजपुरवठा खंडित
मुंबई, ता. ६ ः चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील थकीत वीजबिलांची रक्कम १०० कोटींहून अधिक झाल्याने आज सकाळी अदाणी इलेक्ट्रिसिटीने वसाहतीचा वीजपुरवठा खंडित केला. वारंवार प्रयत्न करूनही थकबाकी वसूल होत नसल्याने या कारवाईचे ‘अदाणी’ने समर्थन केले आहे.
थकबाकी वसुलीसाठी अदाणीकडून दरवेळी प्रयत्न केले जाते; मात्र आंदोलने आणि निदर्शनांमुळे या प्रयत्नांना खीळ बसत होती. वीज कायद्यांतर्गत ग्राहकहिताचे संरक्षण करण्यासाठी वीजचोरी आणि थकबाकीविरुद्ध ‘अदाणी’ने कठोर भूमिका घेतली आहे. तरीही मानवतावादी दृष्टिकोनातून कंपनीने रहिवाशांच्या थकबाकी चुकती करण्याच्या आश्वासनावर विसंबून अनेकदा वीजपुरवठा सुरू ठेवला; मात्र अनेक स्वार्थी दबावगट रहिवाशांची दिशाभूल करत असल्याचा ‘अदाणी’चा दावा आहे.
---
कारवाईचे समर्थन
थकबाकीदार नेहमीच कंपनीच्या कामातही अडथळा आणतात. अनेक ग्राहकांनी खंडित वीज पूर्ववत करून वीजचोरी सुरू केली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या हितासाठी सिद्धार्थ कॉलनीतील थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा हक्क आम्हाला आहे, असे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने म्हटले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81355 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..