निराधारांच्या आश्रयासाठी एस्सारचा हातभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निराधारांच्या आश्रयासाठी एस्सारचा हातभार
निराधारांच्या आश्रयासाठी एस्सारचा हातभार

निराधारांच्या आश्रयासाठी एस्सारचा हातभार

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : एस्सार फाऊंडेशन या ‘एस्सार’च्या सीएसआर शाखेने समाज कार्यात हातभार लावण्याची आपली परंपरा यंदाही कायम ठेवली. एस्सारने नाशिकच्या लासलगावमधील जय जनार्दन स्वामी आश्रमातील रहिवाशांना एक नवे घर व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत.

लासलगाव या छोट्याशा गावात असलेल्या जय जनार्दन स्वामी आश्रमाला एस्सारतर्फे नवीन परिसर उभारण्यासाठीही सहाय्य करण्यात येत आहे. त्याद्वारे अनाथ, दिव्यांग रहिवाशांसाठी घरे बांधण्यात येत आहेत. याबद्दल बोलताना एस्सार फाऊंडेशनचे सीओओ डॉमिनिक डिसूझा म्हणाले की, या आश्रमात माणुसकी जगवत अनाथांचा सांभाळ आणि सर्वांगीण विकासाचे काम होत आहे. या कार्यात आम्हाला योगदान देता येत असल्याने आम्ही आनंदी आहोत.

आश्रमाचे सचिव दिलीप गुंजाळ म्हणाले की, एस्सार फाऊंडेशनने आम्हाला आश्रमाच्या स्थापनेपासून सर्वतोपरी मदत केली. मुलांचा आश्रय देण्यात त्यांनी केलेल्या सहाय्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. दिलीप गुंजाळ व संगीता गुंजाळ दाम्पत्य हे आश्रम चालवते. येथे ९० हून अधिक मुले (अपंग व गतिमंद) आणि २० ज्येष्ठ नागरिक राहतात. या मुलांना शिक्षणासाठी स्थानिक पालिका शाळेत दाखल केले गेले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81357 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top