अडचणी सोडविण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाचे ऑनलाईन ॲप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अडचणी सोडविण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाचे ऑनलाईन ॲप
अडचणी सोडविण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाचे ऑनलाईन ॲप

अडचणी सोडविण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाचे ऑनलाईन ॲप

sakal_logo
By

म. फुले विकास महामंडळाचे
तक्रारींसाठी ‘माय ऑर्बिट’ अॅप
मुंबई, ता. ६ ः महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी लवकरच ‘माय ऑर्बिट’ हे ऑनलाईन अॅप सुरू केले जाईल. त्यानंतर या अडचणी कालबद्धप्रकारे सोडवल्या जातील.
महामंडळातर्फे लाभार्थींसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्यांचा लाभ घेताना लाभार्थ्यांना विविध अडचणी येत असतात. त्यासंदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी महामंडळ लवकरच ‘माय ऑर्बिट’ हे ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लॅटफॉर्म सुरू करणार आहे. याद्वारे लाभार्थ्यांना आपल्या अडचणी नोंदवता येणार असून ठराविक दिवसांमध्येच त्याचे निरसनदेखील होईल. लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी ‘माय ऑर्बिट’ प्रणालीमध्ये नोंद करणे आवश्यक आहे. यात लाभार्थ्यांनी मांडलेल्या समस्या प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला जिल्हा व्यवस्थापकांपर्यंत पोहचविण्यात येतील. जिल्हा व्यवस्थापक १७ तारखेपर्यंत त्या निकाली लावतील. शिल्लक राहिलेले अर्ज १८ ते २० तारखेपर्यंत प्रादेशिक व्यवस्थापक निकाली काढतील. त्यानंतरही काही समस्यांचे अर्ज शिल्लक राहिल्यास ते प्रकल्प व्यवस्थापन समिती २५ तारखेपर्यंत त्यांचे निरसन करेल. लाभार्थ्यांना आपल्या गावात, शहरात उपलब्ध असलेल्या संग्राम केंद्र, महा-ई-सेवा केंद्रामध्येसुद्धा या प्रणालीचा वापर करता येईल, अशी माहिती महामंडळातर्फे देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81359 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top