आयपीएलच्या मॅचवर बेटींग लावणारी टोळी अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयपीएलच्या मॅचवर बेटींग लावणारी टोळी अटकेत
आयपीएलच्या मॅचवर बेटींग लावणारी टोळी अटकेत

आयपीएलच्या मॅचवर बेटींग लावणारी टोळी अटकेत

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : नेरूळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज या संघांत सुरू असलेल्‍या सामन्‍यावर मोबाईलवरून ऑनलाईन बेटिंग लावणाऱ्या ८ सट्टेबाजांना नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने स्टेडियममध्ये छापा मारून मंगळवारी रात्री अटक केली. या कारवाईत पोलिसांनी १३ मोबाईल फोन; तसेच ३२,६७० रुपयांची रोख रक्कम असा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. या टोळीने बेटिंग लावण्यासाठी वापरलेले सिमकार्ड हे बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविल्याचे तपासात आढळून आले आहे.
आयपीएलचा सामना पाहण्यासाठी बसलेल्‍या काही व्यक्ती गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सुरू असलेला लाईव्ह क्रिकेट सामना पाहून मोबाईलवरील ॲप व वेब ब्राऊझरमध्ये बेटिंग-सट्टा खेळत व खेळवत असल्याचे आढळून आले. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने घेराव घालून राजकुमार श्रीवास्तव (३८), अमिर सोहेल जफार अल्ली (२४), प्रशांत रामदास हेडावू (३८), अजय विनोद भाई दबगर (२३), हार्दिककुमार राजेंद्रकुमार बारोत (३८), संदीप शेट्टी नारब शेट्टी धनपाल (३१), तिरुमला व्यंकटन नागेंद्र बाबू (२९) आणि सीमा रविशंकर या आठ जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेने या ८ सट्टेबाजांना अटक करून त्यांच्याकडून १३ मोबाईल फोन व रोख रक्कम असा सुमारे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्‍त केला आहे.
बनावट सिमकार्डचा वापर
पकडल्या गेलेल्या टोळीने बेटिंग लावण्यासाठी वापरलेले सिमकार्ड हे बोगस नावाने तसेच बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे या टोळीविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यासह, इंडियन टेलिग्राफ ॲक्ट, आयटी ॲक्ट तसेच बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81360 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top