फिर्यादीच निघाला गुन्ह्यातील आरोपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फिर्यादीच निघाला गुन्ह्यातील आरोपी
फिर्यादीच निघाला गुन्ह्यातील आरोपी

फिर्यादीच निघाला गुन्ह्यातील आरोपी

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ६ (बातमीदार ) : बांधकाम व्यावसायिकावर झालेल्या गोळीबाराचा प्रकार बनाव असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून जमिनीच्या वादातून विरोधकास फसवण्याच्या उद्देशाने स्वत:वर गोळीबार केल्याप्रकरणी फिर्यादी बांधकाम व्यावसायिक कमरूद्दीन यांच्यावर गुन्हा दाखल करण्‍यात आला. याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अंबरनाथ पश्चिमेत राहणारे बांधकाम व्यावसायिक कमरूद्दीन खान २४ एप्रिल रोजी वांद्रापाडा येथील त्यांच्या कार्यालयात बसले असताना, अचानक त्यांच्यावर गोळीबार झाला होता. हल्लेखोरांनी पिस्तुलातून झाडलेल्या दोन्ही गोळ्या भिंतीवर लागल्या होत्या. मात्र खान यांच्यावर अतिशय जवळून हल्ला झाल्याचे सीसी टीव्हीत कैद झाले होते. त्यामुळे हल्ला संशयास्पद वाटत होता; तर नियाज सिद्धीकी यांनी जमिनीच्या वादातून हल्ला केल्याचा आरोप कमरुद्दीन खान यांनी केला होता. सीसी टीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोहम्मद हुसेन र्फ अल्लाबक्ष इसाक सय्यद आणि कीसन ऊर्फ सुखविंदर यशवंत सिंग या दोन आरोपींना अटक केल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता फिर्यादी कमरुद्दीन यांनीच दोन्ही आरोपींना पिस्तूल देऊन स्वत:च्या कार्यालयाच्या भिंतीवर गोळीबाराचा बनाव केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून एक पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. त्यामुळे केवळ जमिनीच्या वादातून नियाज सिद्धीकी यांना अडकवण्यासाठी हा हल्ला घडवल्याचे तपासात समोर आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81361 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top