चुलत बहिणीवर अत्याचारप्रकरणी १४ वर्षे सक्तमजुरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape
चुलत बहिणीवर अत्याचारप्रकरणी १४ वर्षे सक्तमजुरी

चुलत बहिणीवर अत्याचारप्रकरणी १४ वर्षे सक्तमजुरी

श्रीवर्धन : १५ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर घराच्या माळ्यावर अत्याचार करणाऱ्या ४० वर्षीय युवकाला माणगाव येथील सत्र न्यायाधीश व विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी १४ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये रोख दंड शिक्षा ठोठावली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणारी १५ वर्षीय मुलगी ही नात्याने चुलत बहीण आहे हे माहीत असतानाही आरोपीने मुलीला कामानिमित्त बोलवून घराच्या माळ्यावर नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. ही घटना २० फेब्रुवारी २०१५ रोजी घडली होती. या प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संजय मोगले यांनी केला केला. बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक करून मोगले यांनी त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81363 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top