
पालिकेचे दवाखाने होणार अद्ययावत
मुंबई, ता. ६ : प्रमुख रुग्णालयावरील रुग्णांचा भार कमी करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने त्यांची दवाखाने अद्ययावत करण्याचे निश्चित केले आहे. जून महिन्यापासून हे दवाखाने कार्यान्वित होतील आणि त्यांचे ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र'' असे नामकरण करण्यात येणार आहे.
महापालिकेने १०० पॉलीक्लिनिक आणि दवाखान्यांपैकी १० दवाखान्यांची सुविधा आणि श्रेणी सुधारण्याची योजना आखली आहे. त्यात निदान केंद्र, टेलिमेडिसीन सुविधा आणि मोठ्या रुग्णालयातील सुपर स्पेशालिस्ट सुविधा असतील. प्रायोगिक चाचणी आणि त्रुटींच्या सुधारणेनंतर इतर ९० दवाखानेही सुरू केले जातील, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सध्या पालिकेकडे १८९ दवाखाने आहेत. मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे या दवाखान्यांतून नागरिकांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरवणे कठीण होते. त्यामुळे केईएम, सायन, नायर आणि कूपर या चार प्रमुख पालिका रुग्णालयांमध्ये गर्दी होते.
---
एकाच छताखाली सर्व सुविधा
दवाखान्यांचे अद्ययावतीकरण करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणे आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81364 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..