
सोन्याचे मंगळसूत्र चोरणारा अटकेत
भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील मानकोली गावाजवळ मोटरसायकलवरून ठाण्याकडे जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या आरोपीस नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. जमील मो. आजम शेख (२२, रा. अजमेर नगर, भिवंडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नवी मुंबई येथील वैशाली बनसोडे या महिला तिच्या पती व मुलांसह २० एप्रिल रोजी सायंकाळी मोटरसायकलवरून मुंबई नाशिक महामार्गावरून ठाण्याच्या दिशेने जात होत्या. या वेळी त्यांची दुचाकी महामार्गावरील भिवंडीजवळील माणकोली गांव पुलावर येताच त्यांच्या मागून आलेल्या चोरट्यांनी वैशाली यांच्या गळ्यातील सुमारे एक लाख १३ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरीने खेचून पलायन केले होते. या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात महिलेने २१ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली होती. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81374 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..