महावितरणच्या दुय्यम अभियंत्याला चार वर्षे सश्रम कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणच्या दुय्यम अभियंत्याला चार वर्षे सश्रम कारावास
महावितरणच्या दुय्यम अभियंत्याला चार वर्षे सश्रम कारावास

महावितरणच्या दुय्यम अभियंत्याला चार वर्षे सश्रम कारावास

sakal_logo
By

मनोर, ता. ६ (बातमीदार) : विद्युत जोडणीसाठी लाच घेणाऱ्या महावितरणच्या अभियंत्याचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्याने न्यायालयाकडून अभियंत्याला दहा हजार रुपयांच्या दंडासह चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. गुन्ह्यात सहभागी असलेल्या खासगी इसमालाही न्यायालयाकडून पाच हजार रुपयांचा दंड आणि तीन वर्षांच्‍या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विद्युत जोडणीसाठी लागणाऱ्या कोटेशनवर सह्या करण्यासाठी मागितलेली ४० हजारांची लाच स्वीकारताना वसई तालुक्यातील वालीव भागातील महावितरणचा दुय्यम अभियंता आशिष थोटे (वय ५१)आणि खासगी इसम सखाराम पवार (वय ६१) याला सप्टेंबर २०११ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81378 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top