उल्हासनगरात अमलीपदार्थ विक्रीच्‍या अड्ड्यात चार महिला सूत्रधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात अमलीपदार्थ विक्रीच्‍या अड्ड्यात चार महिला सूत्रधार
उल्हासनगरात अमलीपदार्थ विक्रीच्‍या अड्ड्यात चार महिला सूत्रधार

उल्हासनगरात अमलीपदार्थ विक्रीच्‍या अड्ड्यात चार महिला सूत्रधार

sakal_logo
By

उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : उल्हासनगर रेल्वे स्थानकानजीक संजय गांधी नगरात अमली पदार्थविक्रीचा सर्वात मोठा अड्डा असून संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी, अशी लेखी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष जमील खान ऊर्फ डॉन यांनी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात केली आहे. हे अड्डे चालवणाऱ्या ५ सूत्रधारांची नावे जमील खान यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात दिली असून त्यात चक्क ४ महिलांचा समावेश आहे.
संजय गांधी नगर हे अमली पदार्थाच्‍या विक्रीसाठी कुप्रसिद्ध आहे. काही वर्षांपूर्वी एका पोलिस कर्मचाऱ्याला गर्दुल्ल्यांनी बेदम मारहाण केली होती; तर ५ महिन्यांपूर्वी पूर्ववैमनस्यातून आपापसात झालेल्या हाणामारीत एकाचा खून करण्यात आला होता. या सर्व प्रकारामुळे संजय गांधी नगर परिसरात राहणारे नागरिक दहशतीच्या सावटाखाली वावरत आहेत. त्यामुळे अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या सूत्रधारांवर व म्होरक्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जमील खान डॉन यांनी केली आहे. पोलिस या प्रकरणात दुर्लक्ष करीत असल्याने गुन्हेगारांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत चालल्याचा आरोपही खान यांनी केला आहे. यासंदर्भात मध्यवर्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्याशी संपर्क साधला असता संजय गांधी नगरमध्ये पोलिस पथकाची पाहणी सुरू आहे. या पाहणीत अशा प्रकारची कोणतीही हालचाल दिसून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे कड यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81382 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top