बोरिवली-दहिसर भागात १० मे रोजी पाणीकपात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरिवली-दहिसर भागात १० मे रोजी पाणीकपात
बोरिवली-दहिसर भागात १० मे रोजी पाणीकपात

बोरिवली-दहिसर भागात १० मे रोजी पाणीकपात

sakal_logo
By

मुंबई, ता. ६ ः पालिकेतर्फे बोरिवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासमोर सर्व्हिस रोडवर जलवाहिनी बंद करण्याचे काम मंगळवारपासून (ता. १०) हाती घेण्यात येणार आहे. यामुळे १० मे रोजी सकाळी ११.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत आर मध्य व आर उत्तर विभागात पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करण्यात येणार आहे. तसेच आर उत्तर विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्‍यक पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोणत्या भागात पाणी बंद ? कोणत्या भागात कपात?
१) ‘आर मध्य’ विभाग ः अ) संत ज्ञानेश्वर मार्ग (शांतिवन), श्रीकृष्ण नगर, अभिनव नगर, सावरपाडा, काजुपाडा (सखल पातळी परिसर), ईश्वर नगर, सुदाम नगर, चोगले नगर - (कामादरम्यान पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ८.३० ते १०).

‘आर उत्तर’ विभाग ः ब) ओवरीपाडा (अंशत:), राजेश कुंपण, शांती नगर, अशोकवन (सखल पातळी परिसर), शिव वल्लभ मार्ग (दक्षिण बाजू), संत ज्ञानेश्वर मार्ग, न्यांसी डेपो, चोगले नगर, सावरपाडा, संभाजी नगर, शिव टेकडी, संतोष नगर, गणेश नगर, शुक्ला कुंपण, पांडे नगर - (कामादरम्यान सकाळी ८.३० ते १० पाणीपुरवठा).

२) ‘आर मध्य’ विभाग ः अ) काजुपाडा (उंच पातळी परिसर), माने कंपाऊंड, पाटील कंपाऊंड, जगरदेव कंपाऊंड, ओम सिद्धराज संकुल, गिरीशिखर संकुल, मोठी मशीद परिसर - (कामादरम्यान सकाळी १० ते ११.३० पाणीपुरवठा).

‘आर उत्तर’ विभाग ः ब) अशोक वन (उंच पातळी परिसर), देशमुख रेसिडेन्सी, साईश्रद्धा फेज १ व २ - (कामादरम्यान सकाळी १० ते ११.३० पाणीपुरवठा).

३) ‘आर उत्तर’ विभाग ः शिव वल्लभ मार्ग (उत्तर बाजू), मारुती नगर, रावळपाडा, एस. एन. दुबे मार्ग, संत कबीर मार्ग, कोकणीपाडा, धारखाडी, सुहासिनी पावसकर मार्ग, वैशाली नगर, केतकीपाडा (अंशत:), एकता नगर, दहिसर टेलिफोन एक्स्चेंज, घरटनपाडा क्रमांक १ व २, संत मिराबाई मार्ग, वाघदेवी नगर, शिवाजी चौक, केशव नगर - (कामादरम्यान पाणीपुरवठा बंद).

४) ‘आर उत्तर’ विभाग ः आनंद नगर, आशीष संकुल, एन. एल. संकुल, वीर संभाजी नगर, छत्रपती शिवाजी संकुल, भाबलीपाडा, अवधूत नगर, वर्धमान औद्योगिक इस्टेट, सुधींद्र नगर, केतकीपाडा ऑन लाईन पंपिंग - (कामादरम्यान पाणीपुरवठा बंद).

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81384 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top