प्रारुप प्रभाग रचनेवर १४ मेपर्यंत हरकती दाखल करण्यास मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रारुप प्रभाग रचनेवर १४ मेपर्यंत हरकती दाखल करण्यास मुदत
प्रारुप प्रभाग रचनेवर १४ मेपर्यंत हरकती दाखल करण्यास मुदत

प्रारुप प्रभाग रचनेवर १४ मेपर्यंत हरकती दाखल करण्यास मुदत

sakal_logo
By

नगर परिषद, नगरपंचायत निवडणूक ः

मुंबई, ता. ६ ः राज्यातील विविध २१६ नगर परिषदा, तसेच नगरपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर १० ते १४ मे २०२२ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील, असे राज्य निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची कार्यवाही १० मार्च २०२२ रोजी असलेल्या टप्प्यांपासून पुढे सुरू करावी, असा आदेश ४ मे २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने ही कार्यवाही सुरू केली आहे. यात २०८ नगर परिषदा व ८ नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर १० ते १४ मे २०२२ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यावर जिल्हाधिकारी २३ मे २०२२ पर्यंत सुनावणी घेतील. प्रभाग रचनेचे प्रारूप १० मार्च २०२२ रोजीच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावेळी प्राप्त झालेल्या व आता नव्याने प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांवर एकत्रित ही सुनावणी घेण्यात येईल. अंतिम प्रभाग रचना ७ जून २०२२ पर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81391 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top