सत्ताधाऱ्यांनी राजकारण करायचे तर सरळ खेळावे - मनसे आमदार राजू पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सत्ताधाऱ्यांनी राजकारण करायचे तर सरळ खेळावे - मनसे आमदार राजू पाटील
सत्ताधाऱ्यांनी राजकारण करायचे तर सरळ खेळावे - मनसे आमदार राजू पाटील

सत्ताधाऱ्यांनी राजकारण करायचे तर सरळ खेळावे - मनसे आमदार राजू पाटील

sakal_logo
By

कल्याण ता. ६ (बातमीदार) : सत्ताधाऱ्यांना जर राजकारण खेळायचं आहे तर सरळ खेळावं. आमच्या पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना धमकावलं जातंय. त्‍यांच्‍यावर दबाव टाकला जात आहे, असा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. पोलिसांनी नोटीस बजावल्याने आमदार पाटील यांच्‍यासह कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी मानपाडा पोलिस ठाणे गाठल्याची चर्चा होती. मोठा पक्ष म्हणवणारे घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोप पाटील यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला. प्रत्येकाने पक्ष वाढवावा, पण राजकारण करताना सरळ करण्याचे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले. दरम्‍यान, मनसेचे माजी नगरसेवक प्रभाकर जाधव यांच्‍या शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू असतानाच पाटील हे जाधव यांना घेऊन पोलिस ठाण्यात दाखल झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81393 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top