महाविकास सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपचे आंदोलन
महाविकास सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपचे आंदोलन

महाविकास सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपचे आंदोलन

sakal_logo
By

पालघर, ता. ६ (बातमीदार) : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा न्यायालयाने ओबीसी आरक्षण बाजूला ठेवून निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे राज्याच्या आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी पालघर हुतात्मा चौकाजवळ भाजपच्या जिल्हा कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मुंडन करून सरकारचा निषेध केला. महाविकास आघाडी सरकार न्यायालयात सातत्याने ओबीसीची बाजू मांडण्यात असमर्थ ठरली आहे. महाविकास आघाडी सरकारची ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून देण्याची इच्छा नाही, अशा सरकारचा आम्ही निषेध करीत आहोत, असे भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भाषणात सांगितले. या आंदोलनात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला; या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा संघटक संतोष जनाठे, जिल्हा सरचिटणीस सुजित पाटील, सरचिटणीस सुशील औसारकर, नगरसेवक भावानंद पाटील, अरुण माने व भाजप कार्यकर्ते उपस्‍थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81395 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top