भिवंडी पंचायत समितीचे माजी उपसभापती अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी पंचायत समितीचे माजी उपसभापती अटकेत
भिवंडी पंचायत समितीचे माजी उपसभापती अटकेत

भिवंडी पंचायत समितीचे माजी उपसभापती अटकेत

sakal_logo
By

भिवंडी, ता. ६ (वार्ताहर) : मुंबई-वडोदरा महामार्गात जमीन गेलेल्या भिवंडी तालुक्यातील नांदिकणे गावातील ८ शेतकऱ्यांची बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल ११ कोटी ६६ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य गुरुनाथ जाधव यांच्यासह मनीषा पवार-जाधव, ॲड. प्रवीण पाटील, दिनेश पुरोहित, कृष्णमिलन शुक्ला यांना अटक करण्यात आली आहे.
जमिनीचा मूळ मालक नारायण भोईर यांची सर्व्‍हे ८ मध्ये एकूण १७ हजार ८२४ चौरस मीटर जमीन असून ही मुंबई-वडोदरा महामार्गासाठी संपादित केली आहे. नारायण भोईर मृत असल्याने त्यांचे ९ वारस असलेले प्रभावती भोईर, मनीषा वैरी, विदुला दळवी, लीना विंचूरकर, सुवर्णा पाटील, विनित भोईर, अमोल भोईर, हरेश भोईर या वारसांना मोबदला मिळायचा होता; परंतु जमिनीचे कुलमुखत्यारधारक सांगत नरेंद्र भोईर याने भावंडाच्या दस्तऐवजासह सर्व शासकीय नोंदणीची कागदपत्रे महसूल कार्यालयात जमा करून ११ कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम बँक खात्यात वळून घेतली. जमा झालेली रक्कम कृष्णमिलन शुक्ला यांच्या बँक खात्यात वळविण्यात आली. ही रक्कम ज्वेलर्सकडे वळवून तेथून घाऊक सोने खरेदी करून, ते प्रत्येकाला वितरित करण्याचा इरादा होता. मग इथेच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. कमी- जास्त हिश्श्यावरून वाद वाढू लागल्याने, याची कुणकुण मूळ खातेदार शेतकऱ्याला लागल्यावर फसवणुकीचे बिंग फुटले. शेतकऱ्याच्या फसवणूकप्रकरणी सर्वांना अटक करण्यात आली. याप्रकरणी सखोल चौकशी करून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81399 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top