मोबाईल चोरट्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल चोरट्यास अटक
मोबाईल चोरट्यास अटक

मोबाईल चोरट्यास अटक

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ७ (बातमीदार) ः गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोराला वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली. अन्वर शेख (वय २३) असे त्या चोरट्याचे नाव असून त्याने चौकशीदरम्यान आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली आहे. या दोन्ही गुन्ह्यांची उकल करण्यात यश मिळवत वाशी रेल्वे पोलिसांनी दोन्ही मोबाईल जप्त केले आहेत.
मानखुर्दच्या लल्लुभाई वसाहतीतील रहिवासी जॉन नवल सोमवारी (ता.२) चेंबूरला जाण्यासाठी मानखुर्द स्थानकात गाडीची वाट पाहत उभे होते. त्या वेळी अन्वरने त्यांच्या हातातील मोबाईल फोन हिसकावून पळ काढला. जॉन यांनी त्याच्याविरोधात वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान ही चोरी मानखुर्दच्या चिता कॅम्प परिसरातील अन्वरनेच केली असल्याची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी करत असताना त्याने या गुन्ह्यासह आणखी एका गुन्ह्याची कबुली दिली. ते दोन्ही मोबाईल पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81401 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top