गोवंडीत अमली पदार्थाचा साठा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवंडीत अमली पदार्थाचा साठा जप्त
गोवंडीत अमली पदार्थाचा साठा जप्त

गोवंडीत अमली पदार्थाचा साठा जप्त

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ७ (बातमीदार) ः गोवंडी पोलिसांनी बुधवारी (ता. ४) एक लाख रुपये किमतीच्या एमडी या अमली पदार्थासह तीन लाख रुपयांची रोकड जप्त केली. हा अमली पदार्थाचा साठा व रोकड घेऊन निघालेल्या इम्तियाज शेख (वय ३८) याला पोलिसांनी अटक केली आहे. गोवंडीच्या बोरला येथील बोरबादेवी मंदिराजवळ गोवंडी पोलिसांचे पथक बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बंदोबस्तावर होते. त्या वेळी त्या ठिकाणी हातात पिशवी घेऊन इम्तियाज निघाला होता. त्याच्या हालचाली संशयास्पद असल्याचे पोलिस पथकाच्या लक्षात आले. तेव्हा पथकाने त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडील पिशवीत ५२ ग्रॅम एमडी अमली पदार्थाचा साठा आणि तीन लाख रुपये रोख आढळले. त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने इम्तियाजला सोमवारपर्यंत (ता. ९) पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81405 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top