
गोदी कामगारांना थकबाकी द्या!
वडाळा, ता. ७ (बातमीदार) ः मुंबई पोर्ट प्रशासनाने गोदी कामगारांची व पेन्शनर्सची उर्वरित थकबाकी ताबडतोब देण्याची मागणी ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने शुक्रवारी (ता. ६) माझगाव येथील कामगार सदन सभागृहात युनियनच्या १०३ व्या वर्धापनदिन सोहळ्यात केली.
भारतातील प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांसाठी १ जानेवारी २०१७ पासून लागू होणारा वेतन करार ३१ ऑगस्ट २०१८ रोजी झाला असून इतर बंदरांतील कामगारांना थकबाकी मिळाली. मात्र मुंबई बंदरातील कामगारांना २० टक्के थकबाकी दिली असून, अद्याप ८० टक्के थकबाकी मिळाली नाही. या वेळी कार्यक्रमाला मुंबई पोर्ट ट्रस्टचे माजी विश्वस्त व युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, डॉ. यतीन पटेल, विद्याधर राणे, दत्ता खेसे, विकास नलावडे व विठोबा पवार आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81410 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..