
पार्ल्यातील चाळीत गटाराचे पाणी घरात
मालाड, ता. ७ (बातमीदार) ः विलेपार्ले पूर्वेतील हनुमान रोड येथील हनुमान मंदिरालगतच्या इंदुलकर चाळीतील गटार तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या मोरीत भरले आहे. या चाळीत ३० कुटुंबे राहत आहेत. या चाळीतील काही घरांत वर्षाचे १२ महिने घाण पाणी साचते.
येथील गटारात घाण कचरा, प्लास्टिक बाटल्या आणि गाळ असू तो उपसला नसल्याने या गटारातील पाण्याचा निचरा होत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. पालिकेकडून वरवर सफाई केली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. ‘घाण पाण्यामुळे आमचे जीव धोक्यात आले आहे. अनेक वर्षे आम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेत अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा दुर्लक्ष होत आहे,’ असे चाळीतील राहिवासी महिला रेश्मा बाईत यांनी सांगितले. ‘मुंबईसारख्या शहरात साधे गटारही ५ ते ६ वर्षे साफ होत नसेल तर त्याला जबाबदार कोण? आमच्यासारख्या गरिबांना एकीकडे जगण्यासाठीचा संघर्ष सुरू असताना दुसरीकडे घरात घाण पाण्यामुळे आजारांची लागण झाली तर मग आम्ही जगायचे तरी कसे,’ असा प्रश्न जयश्री इंदप यांनी केला आहे.
...
या समस्येबाबत माहिती घेऊन गटारे सोमवारी स्वच्छ करू.
- संभाजी दोरुगडे, सहायक अभियंता, परिरक्षण एक के/पूर्व.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81411 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..