मोरबेत पुरेसा पाणीसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोरबेत पुरेसा पाणीसाठा
मोरबेत पुरेसा पाणीसाठा

मोरबेत पुरेसा पाणीसाठा

sakal_logo
By

वाशी ः
उन्हाचा तडाखा वाढला असून अनेक ठिकाणी विजेसह पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. सर्वच महानगरांमध्ये पाणीकपातीचे सत्र सुरू झाले आहे; मात्र यातून नवी मुंबईकरांची सुटका झाली आहे. नवी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या मालकी हक्काच्या मोरबे धरणात ४१.९९ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. हा जलसाठा किमान ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल इतका असल्याने नवी मुंबईकरांची तहान भागणार आहे.
रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यांत नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. याला नवी मुंबई शहर अपवाद ठरले आहे. लगतच्या पनवेल महापालिकेतही अनेक भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
नवी मुंबई पालिका क्षेत्रातील रहिवाशांना मोरबे धरणातून दैनंदिन ४४० एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी धरण व सिडकोच्या हेटवणे धरण अशा तीन स्रोतांमधून दररोज एकूण सरासरी ३३० द.ल.लि. इतका पाणीपुरवठा केला जात आहे.
नवी मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची साठवणक्षमता ही ८८ मीटर असून ६ मे २०२२ पर्यंत ७४.७२ मीटरपर्यंत पाण्याची पातळी आहे; तर मोरबे धरणात सद्यस्थितीत ८०.१६३ एम.सी.एम. इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा साधारण ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरेल इतका आहे.

गतवर्षी झालेल्‍या समाधानकारक पावसाने नवी मुंबईकरांना दिलासा मिळाला असला, तरी नवी मुंबईकरांनी पाणी काटकसरीने वापरावे, पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करू नये, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोरबे धरणाची स्थिती
एकूण साठवण क्षमता- ८८ मीटर
सध्याची पातळी- ७४.७२ मीटर
शिल्लक पाणीसाठा- ८०.१६३ एमसीएम

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81413 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top