पासपोर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पासपोर्ट
पासपोर्ट

पासपोर्ट

sakal_logo
By

खारघर : पनवेल महापालिकेतील सर्वात मोठा नोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघरच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस भर पडत असून पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. खारघर पोलिस ठाण्यात दर महिन्यात जवळपास १२०० नागरिकांचे अर्ज प्राप्त होत असून खारघरमध्ये पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पुण्यानंतर खारघर हे शैक्षणिक हब म्हणून उदयास येत आहे. त्यामुळे अनेकांनी या भागात घरे घेतली. राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय दर्जाची महाविद्यालये, व्यावसायिक प्रशिक्षण संस्‍थामध्ये राज्‍याबरोबरच देशभरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शहरात गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क, सिडकोकडून खारघर कार्पोरेट पार्क उभारण्यात येत आहे; तर रस्ते विकास महामंडळाकडून तुर्भे औद्योगिक वसाहत ते खारघर हा सहा किलोमीटर लांबीचा पारसिक डोंगर पोखरून भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. लवकरच नवी मुंबई मेट्रो सुरू होणार आहे.
खारघरमध्ये उच्चभ्रू व श्रीमंत आणि विदेशात नोकरी करणारे नागरिक मोठ्या संख्येने वास्‍तव्य करीत आहेत. त्‍यांच्यासाठी पासपोर्ट महत्त्वाचा आहे. पासपोर्टशिवाय परदेशी प्रवास करता येणार नाही. त्यामुळे खारघर पोलिस ठाण्यात पासपोर्टसाठी महिन्यात १,२००; तर वर्षभरात जवळपास १५,००० अर्ज येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्‍यांची संख्या मोठी आहेत.

खारघर हा सर्वात मोठा नोड असून विद्यार्थीसंख्या अधिक आहेत. अनेक नागरिक विदेशात नोकरीसाठी आहे. त्यात पासपोर्ट हा वास्तव्याचा सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणून वापरला जातो. त्यामुळे खारघरमध्ये पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
- संदीपान शिंदे, वरिष्ठ निरीक्षक, खारघर पोलिस ठाणे

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81414 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top