मुंबई प्रतिक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई प्रतिक्रिया
मुंबई प्रतिक्रिया

मुंबई प्रतिक्रिया

sakal_logo
By

सर्वसामान्यांना चटके
महागाईचेच `अच्छे दिन`

देशातील सर्वसामान्य नागरिक पेट्रोल-डिझेल दरवाढीचा सामना करत असताना घरगुती गॅस सिलिंडरच्या दरातही ५० रुपयांची वाढ झाली आहे. मोदीपूर्व काळात ४०० ते ५००च्या घरात असलेला हा सिलिंडर आता तब्बल १००० रुपयांचा झाला आहे. इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट आधीच शेवटच्या घटका मोजत असताना, सिलिंडरच्या दरवाढीने सर्वसामान्यांना आणखी झटका बसला आहे. महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतच असल्याने केंद्रातील भाजप सरकारच्या काळात सर्वसामान्यांऐवजी महागाईलाच `अच्छे दिन` आले आहेत, अशा संतप्त प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.
............

दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यात आता सिलिंडरचे दर आणखी वाढल्यामुळे खर्चात अतिरिक्त भर पडली आहे. महिन्याचा खर्च भागवताना कसरत करावी लागते. सरकारने सिलिंडरचे दर ५० रुपयांनी वाढवले, त्या पैशांत दोन दिवसांची भाजी होऊ शकते. याची सरकारला अजिबात जाणीव नाही.
- पूर्वा म्हात्रे, प्रभादेवी.

‘अच्छे दिन'' चे स्वप्न दाखवणाऱ्या केंद्र सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल केले आहे. इंधन व सिलिंडर दरवाढीमुळे किचनचे बजेट कोलमडले आहे. हातावरचे पोट असणाऱ्यांना आता पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. दिवसाला १०० रुपयांची कमाई नाही आणि हजारी पार केलेला सिलिंडर विकत कसा घ्यायचा?
- राजेश्री सुतार, शिवडी.

पेट्रोल, डिझेल, घरगुती सिलिंडरचे दर वाढल्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. महागाई कमी करण्याऐवजी वाढवली जाते. त्यावर कोणाचेच नियंत्रण आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे.
- श्रेया प्रधान, मुलुंड.

महागाईने आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना, सिलिंडरचे दर वाढल्याने घरखर्च भागवताना नाकीनऊ येत आहेत. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
- राजश्री कोकणे, भांडुप.

आधीच महागाईने होरपळलो आहोत, त्यात घरगुती सिलिंडरच्या दरात सतत होणारी दरवाढ म्हणजे डोक्याला ताप झाला आहे. यामुळे घराचे आर्थिक बजेट व नियोजन बिघडत आहे. सरकारने सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.
- उशा पाईकराव, गोरेगाव.

कोरोना काळात कोलमडलेली आर्थिक परिस्थिती अजून रुळावर आलेली नाही. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची केलेली दरवाढ अन्यायकारक आहे. महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ महिलांच्या पदरी पडत नाही. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईवर नियंत्रण आणावे.
- सुषमा पांचाळ, वडाळा.

सिलिंडरचे दर वाढल्याने महिन्याचे बजेट कोलमडले आहे. सरकारने वाढत्या महागाईवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. अशा महागाईत मध्यमवर्गीय कुटुंबांनी कसे जगावे, हे सरकारनेच सांगावे.
- हिल्डा नाडार, धारावी.

मी भाड्याच्या घरात राहते. घरकाम करून उदरनिर्वाह करते. दोन मुले आहेत. महागाई वाढत असतानाच, सिलिंडरचे दर वाढल्याने आपली चूल बरी, असे वाटते. सरकार खरच गरिबांना पुन्हा चुलीकडे वळवण्याच्या मार्गावर दिसत आहे.
- नितू शर्मा, गोरेगाव.

सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव दररोज वाढत असताना अशा महागाईत सर्वसामान्यांनी जगायचे कसे? सिलिंडर दरवाढीमुळे आमचे महिन्याचे बजेट कोसळले आहे. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे आणि दरवाढ कमी करावी.
- संगीता देसाई, मुलुंड.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81417 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top