२७ ते २९ मे दरम्यान मनसेचा ''उरण महोत्सव'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२७ ते २९ मे दरम्यान मनसेचा ''उरण महोत्सव''
२७ ते २९ मे दरम्यान मनसेचा ''उरण महोत्सव''

२७ ते २९ मे दरम्यान मनसेचा ''उरण महोत्सव''

sakal_logo
By

उरण, ता. ७ (वार्ताहर) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने २७ ते २९ मे रोजी उरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बोकडविरा येथील सिडकोच्या मैदानात होणाऱ्या या महोत्सवात विविध प्रकारच्या स्टॉल्सची रेलचेल असणार आहे. या महोत्सवात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, प्रॉपर्टी एक्स्पो, ऑटोमोबाइल्स, लॉजेस्टिक जॉब फेर यांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे. या महोत्सवात पाककला स्पर्धा, विविध मसाल्याचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. महिला बचत गटांनी बनविलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, म्हणून त्यांना मोफत स्टॉल देण्यात येणार आहे. मनसेच्या नेत्यांबरोबरच मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलावंत हजेरी लावणार असल्याने ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81419 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top