दिघा येथील बोरला तलावाचा कायापालट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिघा येथील बोरला तलावाचा कायापालट
दिघा येथील बोरला तलावाचा कायापालट

दिघा येथील बोरला तलावाचा कायापालट

sakal_logo
By

वाशी, ता. ७ (बातमीदार) : बोरला तलावाला नवी मुंबई महापालिकेने संजीवनी देण्याचे काम सुरू केले आहे. शहराच्या विविध भागांत असणारे २४ तलाव नवी मुंबईच्या पर्यावरणशीलतेमध्ये लक्षणीय भर घालताना दिसतात. त्यामध्ये आता विकसित अशा तलावाची भर पडणार आहे.

दिघा येथील रामनगर भागात असलेला बोरला तलाव ७ हजार १०७ चौ.मी. आकाराचा आहे. हा तलाव मागील काही वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत होता. तलावाच्या जलाशयात अनिर्बंध वाढलेल्या पाणवनस्पतींमुळे, तसेच तलावामध्ये बांधकामाचा राडारोडा टाकला गेल्यामुळे या तलावाची पूर्णत: दुरवस्था झाली होती. तलावाचे नूतनीकरण करण्याबाबत स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्याने मागणी केली जात होती.

मे २०२१ पासून तलावातील गाळ काढणे व सुधारणा कामाला नियोजनबद्ध रीतीने सुरुवात करण्यात आली आहे. या तलावाच्या बाजूला सुशोभीकरणांतर्गत तलावाभोवती ३७० मीटरचा जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आला आहे. तलावाभोवती नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस लावण्यात येत आहेत. तसेच नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी ओपन जिमचीही व्यवस्था करण्यात येत आहे. रामनगर परिसरातील नागरिक विरंगुळ्याचे आकर्षक ठिकाण विकसित झाल्याबदल समाधान व्यक्त करीत आहेत.

नवीन रस्ता
या तलावाची साफसफाई करण्यासाठी तिथपर्यंत पोहचण्याकरिता अत्यंत अरुंद जागा असल्यामुळे तलावातील गाळ काढणे व तलाव स्वच्छ करणे अतिशय अडचणीचे होते. या अनुषंगाने तलावाची सुधारणा करण्यासाठी तलावाशेजारी असलेल्या मुकंद आयर्न कंपनीच्या हद्दीतून नवी मुंबई महापालिकेमार्फत तलावापर्यंत रस्ता काढण्यात आला आहे. बोरला तलावाच्या काठापर्यंत पोहचून तलावातील गाळ काढण्याचे व तलाव सुधारण्याचे काम करण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81421 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top