ईशान्येकडील माजी सैनिकांसाठी अथर्व फाउंडेशनतर्फे रुग्णवाहिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ईशान्येकडील माजी सैनिकांसाठी अथर्व फाउंडेशनतर्फे रुग्णवाहिका
ईशान्येकडील माजी सैनिकांसाठी अथर्व फाउंडेशनतर्फे रुग्णवाहिका

ईशान्येकडील माजी सैनिकांसाठी अथर्व फाउंडेशनतर्फे रुग्णवाहिका

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ ः ईशान्येकडील राज्यांतील शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी अथर्व फाऊंडेशन या संस्थेने दोन रुग्णवाहिका दिल्या. अन्य चार रुग्णवाहिका लवकरच तेथे पाठवल्या जाणार आहेत.
बोरिवलीच्या विटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि आमदार सुनील राणे यांनी सिक्कीम आणि नागालँड या राज्यांच्या प्रतिनिधींना रुग्णवाहिकेच्या चाव्या दिल्या. या कार्यक्रमात सशस्त्र दलातील वरिष्ठ अधिकारी, माजी सैनिक उपस्थित होते.
अथर्व फाऊंडेशनने गेल्या दहा वर्षांमध्ये आजी-माजी सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. मणिपूरच्या माजी सैनिक लीग चुरचंदपूरने रुग्णवाहिका देणगीसाठी विनंती केल्यावर अथर्व फाऊंडेशनने दोन वर्षांपूर्वी त्यांना रुग्णवाहिका दिली. फाऊंडेशनच्या वतीने देशभरातील शहीद जवानांच्या मुलींना शिक्षणासाठी विनामूल्य लॅपटॉपचे वाटप केले जाते. आता नागालँड आणि सिक्कीमच्या राज्य सैनिक मंडळाच्या विनंतीवरून अथर्व फाऊंडेशनने त्यांना दोन रुग्णवाहिका दिल्या.
याशिवाय अथर्व फाऊंडेशनने आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांना लवकरच आणखी चार रुग्णवाहिका देण्याची योजना आखली आहे. या रुग्णवाहिकांचा फायदा तेथील नागरिकांना फक्त आपत्कालीन परिस्थितीतच नव्हे, तर नेहमीच्या आजारांसाठी व उपचारांसाठी रुग्णालयात जातानादेखील होईल, असे अथर्व फाऊंडेशनचे अध्यक्ष व आमदार सुनील राणे म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81437 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top