मोबाईल चोराला नागरिकांनी पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल चोराला नागरिकांनी पकडले
मोबाईल चोराला नागरिकांनी पकडले

मोबाईल चोराला नागरिकांनी पकडले

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ७ (बातमीदार) ः रस्त्याच्या कडेने चालत निघालेल्या महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून पळालेल्या चोराला नागरिकांनी पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. चेंबूरच्या घाटला परिसरात गुरुवारी (ता. ५) सायंकाळी ही घटना घडली.
पकडलेल्या चोरट्याचे नाव जावेद शेख (वय ३३) असून त्याच्या साथीदाराचा शोध पोलिस घेत आहेत. जावेद याच्याविरोधात पार्कसाईट, विक्रोळी तसेच टिळकनगर पोलिस ठाण्यात याआधीच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. घाटला परिसरातील केळकर वाडी येथे राहणारी महिला दीपाली सोनावणे गुरुवारी सायंकाळी कामावरून घरी चालत निघाली होती. ती केळकर वाडीजवळ आली असताना तिच्याजवळ एक रिक्षा येऊन थांबली. त्यात बसलेल्या जावेदने तिच्या हातातून मोबाईल हिसकावला व रिक्षात बसून पळ काढला. महिला व परिसरातील नागरिकांनी रिक्षाचा पाठलाग केला. ती रिक्षा नीलम जंक्शनजवळ असताना पाठलाग करणाऱ्या महिला व नागरिकांनी जावेदला पकडून गस्तीवरील पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवत गोवंडी पोलिसांनी त्याला अटक केली. चोरलेला मोबाईल घेऊन पळालेल्या त्याच्या साथीदाराचा शोध पोलिस घेत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81439 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top