मुलांची पुन्हा मैदानाकडे धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांची पुन्हा मैदानाकडे धाव
मुलांची पुन्हा मैदानाकडे धाव

मुलांची पुन्हा मैदानाकडे धाव

sakal_logo
By

रजनीकांत साळवी : सकाळ वृत्तसेवा

प्रभादेवी, ता. ७ : गेली दोन वर्षे कोरोनामुळे लहान मुलांची परवड झाली होती. त्यांना घरातच क्रीडा प्रकारांचा सराव करावा लागत होता. आता कोरोना आटोक्यात आल्याने परिस्थिती पूर्ववत होत चालली आहे. त्याचप्रमाणे उन्हाळी सुट्टीदेखील जाहीर झाल्याने क्रीडाप्रेमी व खेळाडूंची पावले आपसूकच मैदानांवर वळत आहेत. दादर येथील शिवाजी पार्क मैदानासह मुंबईतील इतर मैदानेही मुलांच्या गर्दीने गजबजली आहेत.
------
आजच्या प्रगतशील आणि तंत्रज्ञानाच्या युगात आजही मैदानी खेळ टिकून आहेत. उन्हाळी सुट्टी पडली की सुरू होतात विविध खेळांची शिबिरे. मुलेदेखील त्याच उत्साहाने या शिबिरात सहभागी होत असतात, परंतु कोरोनामुळे गेली दोन वर्षे या सर्वांमध्ये खंड पडला होता. आता कोरोना आटोक्यात आल्याने शहरे पूर्वपदावर आली आहेत. खेळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शिवाजी पार्क मैदानात सध्या दिवस-रात्र खेळाचा सराव होत आहे. सध्या मल्लखांब, एरियल सिल्क, जिम्नॅस्टिक, क्रिकेट, खो-खो, व्हॉलीबॉल, ज्युडो, वोक क्लाईंबिंग अशा विविध खेळांनी शिवाजी पार्कचे मैदान गजबजून गेले आहे.
दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर भरवण्यात येणारे वासंतिक मल्लखांब हे तितकेच प्रचलित आहे. दोन वर्षे कोरोनामुळे हे शिबिर होऊ शकले नाही; मात्र यंदा ४८ वे वासंतिक शिबिर नुकतेच पार पडले. त्यात एकूण १४०० विद्यार्थ्यांनी शिबिरात सहभाग घेतला होता. वोक्स अँड रन, जम्प, क्लाईम्बिंग, बॅलन्सिंग, स्विंगिंग, रोलिंग, साहित्ययुक्त व्यायाम असे अनेक प्रकार या वासंतिक शिबिरात घेतले जातात. पिळदार आणि लवचिक शरीरयष्टीसाठी मल्लखांब हा सर्वाधिक प्रसिद्ध खेळ मानला जातो. श्री समर्थ व्यायाम मंदिर या संस्थेत एक हजार विद्यार्थी दररोज मल्लखांबचे सराव करीत आहेत. कमीत कमी वेळेत हाताच्या बोटापासून शरीराच्या सर्व अवयवांचा व्यायाम मल्लखांब या खेळातून होतो. त्यामुळे पाच वर्षांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत हा खेळ शिकण्यासाठी येत असल्याचे मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी सांगितले.

उन्हाळी सुट्टीत अनेक संस्था शिबिरांचे आयोजन करतात. त्यात शिबिरात काय काय शिकवण्यात येते, या शिबिरातून मुलांचा कसा फायदा होईल, किती शिक्षक असतात हेदेखील पाहणे आवश्‍यक आहे.
- उदय देशपांडे, मल्लखांब मुख्य प्रशिक्षक, श्री समर्थ व्यायाम मंदिर

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g81440 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top